मुग्धाचे अंग तापाने फणफणत होते. पूर्ण शरीर अंगदुखीने मोडून गेले होते. त्यात स्वयंपाकघराची जबाबदारी. ती कशीबशी भाजी चिरत असताना तिचा छोटा दीर राज पाणी पिण्यासाठी आला. मुग्धाची अवस्था पाहून तो तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला, “वहिनी, तुला तर खूप ताप आहे.”
“हो…” मुग्धा क्षीण स्वरात म्हणाली, “सकाळी तर मी ठीक होते. दुपारपासून अचानक ताप आला.”
“अगं, कशाला मग स्वयंपाक करतेस? मी काहीतरी स्वीग्गी वरून मागवतो.” राज हातात मोबाईल घेत म्हणाला.
“तू फक्त बाहेरचे खाणे खायचा बहाणा शोधात असतोस. काही नको. मी ठीक आहे. पटकन होईल जेवण तयार.” मुग्धा म्हणाली.
“बरं बाबा! नाही मागवत बाहेरचे खाणे. दादाला सांगितलेस का?” राजने तिला विचारले.
“नाही रे, विनय तसाही परवा येणारच आहे… त्याला सांगितले तर उगीच काळजी करत बसेल. होईल माझा ताप बरा.” मुग्धा समजावणीच्या सुरात म्हणाली.
“अरे पण…” राजची काळजी काही कमी झाली नव्हती. पण मुग्धाने त्याला धीर दिला आणि म्हणाली, “काही हरकत नाही.” तो फक्त एक किरकोळ ताप आहे. तू जाऊन अभ्यास कर, जेवण तयार होताच मी तुला बोलावते.”
“म्हणे जेवण तयार होताच मी तुला बोलावते…” मुग्धाची नक्कल करत तिला चिडवत राजने तिच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि म्हणाला, “आज मी बनवतो जेवण.” तू जाऊन आराम कर.”
“नाही… नाही… झोपले तर अजून आजारी पडेन” मुग्धा काही शांत बसायला तयार नव्हती. ती म्हणाली, “मग आपण दोघं मिळून स्वयंपाक करूया.” आणि दोघेही एकत्र स्वयंपाक करू लागले.
मुग्धाचा नवरा विनय कंपनीच्या काही कामानिमित्त ३ दिवसांसाठी बाहेर गेला होता.
विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याने मुग्धा तिच्या संसारात फार खुश होती. ती स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. सासू-सासरे गावी राहत होते. तर मुग्धाचा २१ वर्षांचा दीर राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे त्यांच्यासोबत राहत होता. त्याचे आयुष्य फार सुखात चालले होते. उणीव फक्त एवढीच होती की १० वर्षे सुखी वैवाहिक जीवनानंतरही मुग्धा आणि विणायला मूलबाळ झाले नव्हते. आता मुग्धा ३५ वर्षांची झाली होती. जेव्हा ती तिच्या वयाच्या इतर शिक्षिकेंना त्यांच्या मुलांसोबत पाहायची तेव्हा तिला खूप दुःख व्हायचे आणि याच वेदनेपायी ती आता डायरी लिहू लागली होती.
राजने भाजी केली तर मुग्धाने पोळ्या! राजने आता तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि किचन मी आवरतो म्हणून हट्ट केला. मुग्धा बिचारी शांतपणे खुर्चीत बसली. तिने डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले. वातावरण एकदम शांत होतं. पण राजच्या मनात परत आता वेगळेच वादळ घुमू लागले होते, ज्याचा आवाज मुग्धाला आजतागायत जाणवला नव्हता. राजची मान हळूहळू आता मुग्धाकडे वळली होती. त्याच्या मनातील वासनेचा सैतान आता जागा झाला होता. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तो मुग्धाला वासनांध नजरेने न्याहाळत होता.
ही मराठी कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
“सगळं काम झालं का…?” भांड्यांचा आवाज बंद झाल्याचं लक्षात आल्यावर मुग्धाने अचानक डोळे उघडले.
राज स्तब्ध झाला आणि म्हणाला, “हो वाहिनी! करतोच आहे…” असे म्हणत राजने पटकन उरलेले काम उरकले आणि जेवण डायनिंग टेबलवर नेऊन ठेवले.
मुग्धाने जेमतेम दोन पोळ्या खाल्ल्या, त्याही राजच्या सांगण्यावरून. तो जबरदस्तीने तिच्या ताटात भाजी पोळी टाकत होता. जेवून झाल्यावर मुग्धा झोपायला जायला लागली तेव्हा राज तिला थांबवत म्हणाला, “वहिनी, १५ मिनिटे समोरच्या खोलीत बसा… मी तुमच्यासाठी केमिस्टकडून औषध आणतो.”
“अरे नाही, रातोरात उतरेल ताप…” मुग्धाने नकार दिला. पण राज कसला ऐकतोय?
“मी जवळच्या केमिस्टकडून औषध आणतेय, वहिनी… तुम्ही नेहमी तिथूनच ऑर्डर करता… दार बंद करा… मी आत्ताच आलो…” एवढं बोलून तो निघून गेला.
मुग्धा दार बंद करून सोफ्यावर पाय वर करून बसली.
राजने ठरवले होते की आज मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आपल्या मनाप्रमाणे करायचेच. इतक्यात केमिस्टचे दुकान आले.
“काय राज भाऊ आज बऱ्याच दिवसांनी?” राज दिसल्यावर केमिस्टने त्याला विचारले.
“एक औषध हवं होतं” त्याने उत्तर दिले.
“भाऊ मग काय आम्ही मिठाई विकायला बसलोय काय? इथे औषधाचं मिळेल.” केमिस्ट चिडवत म्हणाला. तो राजचा जुना मित्र होता.
राज हसला आणि म्हणाला, “अरे दे लवकर…”
“दे लवकर…” केमिस्ट कुरकुर करत त्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, “काय दे लवकर? अरे औषधाचं नाव तरी सांग लेक!”
राजला लक्षात आले की त्याने खरंच औषधाचे नावाचं सांगितले नव्हते. तो फक्त गडबडीत म्हणाला, “वहिनीची तब्येत ठीक नाही. तिला ताप आहे. मला फक्त झोपेची गोळी दे.”
‘तापासाठी झोपेची गोळी…’ असा विचार करून केमिस्टने त्याच्याकडे पाहिले. त्याला राजाचे विचार समजले. अशा गोष्टींचा त्याला खूप अनुभव होता. झोपेच्या गोळ्यांसोबतच त्याने तापासाठी औषधही दिले.
राजने औषधांच्या गोळ्या खिशात ठेवल्या आणि पटकन परत जायला निघाला तेव्हा केमिस्ट ओरडला, “अरे भाऊ, कमीत कमी डोस डोस तरी ऐकून जा.”
राजला आपली चूक कळली. तो काउंटरवर आला. केमिस्टने त्याला डोस सांगितला आणि डोळे मिचकावत म्हणाले, “या झोपेच्या गोळीचे एकापेक्षा जास्त डोस देऊ नका… फार कडक माल आहे…”
“अरे, काय बकवास बोलतोयस?” असे म्हणून आपल्या मनातील बिंग बाहेर फुटेल कि काय या भीतीने राज घाईघाईत निघून जाऊ लागला. त्याची अवस्था आता ‘चोराच्या मनात चांदणे’ अशी झाली होती. .
केमिस्ट मागून ओरडत होता, “पुढच्या वेळी आम्हाला पण लक्षात ठेव मित्रा…”
राज त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेला. घरी परतल्यावर राजने मुग्धाला प्रथम तापाचे औषध दिले. ती औषध घेऊन झोपायला निघाली होती, तेव्हा राजने तिला थांबवले, “वहिनी, अजून एक औषध बाकी आहे…”
“किती औषधे आणलीस राज?” मुग्धा थकल्या आवाजात म्हणाली. तिने गोळी घेतली आणि बाम घेऊन कपाळाला चोळू लागली.
“वहिनी, दे, मी लावतो.” असं म्हणत राजने तिच्याकडून बामचा डबी घेतली आणि तिच्या कपाळावर घासायला सुरुवात केली. काही वेळाने मुग्धाला झोपेची यायला लागली आणि ती झोपी गेली.
राज तिचे कपाळ दाबत राहिला. काही वेळाने त्याने मुग्धाला हलवून विचारले “वहिनी, झोपली आहेस का?”
पण त्याला काही मुग्धाकडून प्रतिसाद मिळाला नाही. ती आता गाढ झोपली होती. आपला मार्ग मोकळा झाल्याचे पाहून राज आता खुश झाला. तो मुग्धाकडे अनिमिष नजरेने पाहू लागला. त्याच्या नसानसात वेगाने रक्त वाहू लागले. लाइट बंद करून तो मुग्धाशेजारी झोपला. त्याचवेळी वेगाने खोलीत आलेल्या वाऱ्यामुळे टेबलावर ठेवलेले विनय आणि मुग्धाचा फोटो पडून तु खाली पडून फुटला. कामांध झालेल्या राजने मुग्धावर ती झोपेत असताना पाशवी बलात्कार केला. सर्व काही शांत झाल्यावर राज दमून मुग्धाच्या शेजारी झोपला.
“आता ताप उतरेल तुझा वहिनी… मी तुझ्या तापाचा आता बंदोबस्त केला आहे.” असे राज निर्लज्जपणे बडबडला आणि आपल्या मोबाईलवर मुग्धाचे नग्नावस्थेतले फोटो काढले. मुग्धा झोपेत हळुवारपणे कण्हत होती. राज अंथरुणावरून खाली उतरला आणि स्वत:चे कपडे घालू लागला. तेवढ्यात त्याची नजर साइड टेबलावर पडली. चुकून मुग्धाने तिची डायरी तिथेच ठेवली होती. कपडे घालता घालता राजने डायरीची पाने चाळायला सुरुवात केली. अचानक त्याची नजर एका पानावर पडली. मुग्धाने त्यात लिहिले होते की, ‘आतापर्यंत संतानसुखाअभावी मी खूप रडले आहे. पण आता नाही. माझा मुलगा माझ्यासोबत होता आणि मी त्याला ओळखू शकले नाही. राज पण मला माझ्या मुलासारखाच आहे ना? आम्हाला स्वतःला मूल नसले म्हणून काय झाले? आम्ही लवकरच राजला कायदेशीररित्या दत्तक घेऊ.’ हे सगळे वाचून राजाचे हातपाय थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तो डोकं पकडून मटकन खालीच बसला आणि जोरजोरात रडायला लागला. ‘हे मी काय केलं? ज्या वाहिनीने आतापर्यंत मला मुलासारखे प्रेम दिले तिच्यावर मी…?? शी! लाज वाटते मला स्वतःचीच. आज मी दीर आणि वाहिनीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे? अरे देवा! काय करून बसलो मी हे? आता या जगाला मी माझे काळे तोंड कसे दाखवू?’ राजने फडाफड स्वतःच्या थोबाडीत मारायला सुरवात केली. थोड्यावेळाने थकून जाऊन, नंतर त्याने मुग्धाच्या अंगावर कपडे चढवले. तिच्या पायावर आपले डोके ठेवले आणि घराबाहेर येऊन मग विस्कटलेल्या अवस्थेत तो वेड्यासारखा वाट फुटेल तिथे पळत सुटला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास कुणीतरी मुग्धाला उठवून जाग करत होतं. तिने डोळे उघडले. तिचं डोकं अजूनही जड होतं. तिच्या घरात लोकांची गर्दी जमली होती. तिला उठलेलं बघून एक माणूस म्हणाला, “वहिनी आणि दिराच्या नात्याला ह्या लोकांनी काळिमा फासला आहे…”
हे ऐकून मुग्धाला अंगावर वीज पडल्यासारखा झटका बसला. ती त्या माणसाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तेवढ्यात तेथील पोलीस निरीक्षक आत आले आणि म्हणाले, “तुमचा दीर राजचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला आहे. त्याने काल रात्री आत्महत्या केली…”
मुग्धाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ती घाईघाईने पलंगावरून उठली पण उठताच तोल जाऊन खाली जमिनीवर पडली. तिथल्या एका महिला कॉन्स्टेबलने तिला सावरले आणि काल रात्री राजने त्याच्या मोबाईलमध्ये टिपलेले मुग्धाचे फोटोज तिला दाखवले आणि विचारले, “काल रात्री ही सगळी मजा मारताना त्या मुलाला तू असे काय म्हणालीस की त्या बिचाऱ्याने आपला जीव दिला?”
फोटोज पाहून मुग्धाला प्रचंड धक्का बसला. तिचे डोके अजूनच गरगरायला लागले. तिच्या शारीरिक स्थितीमुळे तिला आपल्यावर कुणीतरी जबरदस्ती केली आहे असा संशय येत होता पण तिचे मन अजूनही ते स्वीकारायला तयार नव्हते. ती ढसाढसा रडायला लागली. इन्स्पेक्टरने लेडी कॉन्स्टेबलला ‘आत्ता काही विचारू नकोस,’ असा इशारा केला आणि विणायला फोन करून, तसेच बाकीची औपचारिकता पूर्ण करून पोलीस तिथून निघून गेला. हळूहळू लोकांची गर्दीही पांगली. तितक्यात विनयचा फोन आला की मी येतोय, घाबरू नकोस, पण मुग्धा त्याला काहीच प्रतिसाद न देता फक्त ऐकत राहिली. तिच्या शून्य झालेल्या डोळ्यासमोर बालपणीचा राज दिसत होता, जेव्हा ती या घरात नव्याने आली होती.
विनय दुपारपर्यंत परतला आणि धावतच मुग्धाकडे खोलीत गेला. ती अजूनही बेडवर बसली होती, शून्याकडे नजर लावून. विनयने तिला हाक मारली. पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण त्याचवेळी मुग्धाचे निष्प्राण शरीर एका बाजूला झुकले.
“मुग्धा…मुग्धा…” विनय ओरडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. पण राज पाठोपाठ मुग्धापण ह्या दुनियेतून निघून गेली होती, कधीही परत न येण्यासाठी!!! राजला त्याच्या कृत्याचा जाब विचारण्यासाठी!!!
समाप्त