Guru Purnima Quotes in Marathi 2024 | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Quotes in Marathi 2024 | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima quotes in Marathi
Guru Purnima quotes in Marathi

Guru Purnima quotes in Marathi : दरवर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा ही ‘गुरु पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2024)  रविवारी, २१ जुलै २०२४ रोजी आहे. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंप्रती श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही वरचे आहे. गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून जीवनात सत्य-असत्य, नीति-अधर्म, पाप-पुण्य, योग्य-अयोग्य याचे ज्ञान मिळते.

जीवनात पुढे जाण्यासाठी गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यासच यश आणि सुख-शांती प्राप्त होते. हिंदू परंपरेत गुरूंना नेहमीच पूजनीय मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला. महर्षी वेदव्यास यांनी वेद आणि पुराणांसह अनेक ग्रंथांची रचना केली होती. गुरुपौर्णिमेच्या विशेष प्रसंगी, आपण आपल्या प्रिय गुरूंना वंदन करून आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून कृतज्ञता व्यक्त करू शकता.

गुरुपौर्णिमा कविता मराठी (Guru Purnima Wishes)

Guru Purnima quotes in Marathi

गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
अर्थात गुरु हेच ब्रह्मा, गुरू हेच विष्णू
आणि गुरु हेच भगवान शंकर आहेत.
गुरु हेच परम परमात्मा आहेत.
अशा गुरूला मी वंदन करतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही,
आत्म्याशिवाय परमात्मा नाही, परमात्म्याशिवाय मोक्ष नाही.
म्हणूनच अज्ञानी, मोक्षहीन आहे तो, ज्याला गुरु नाही..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरू म्हणजे कर्तव्य आणि निष्ठा.
गुरू म्हणजे निस्सीम भक्ती आणि श्रद्धा.
गुरू म्हणजे बुद्धी आणि ज्ञान
गुरू म्हणजे वात्सल्य आणि विश्वास.
गुरू म्हणजे आदर्श आणि संस्कार
गुरू म्हणजे उच्च आचार आणि विचार.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूरुपी पारसाने लोखंडाचे होते स्वर्ण,
जगात शिष्य आणि गुरु, हेच दोन वर्ण.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी,
नमन करितो गुरूंना मी.
तुमच्या ज्ञानाने उजळली,
जीवनाची दशदिशांही.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूच्या मार्गदर्शनाने मिळाले,
सुखदायी जीवनाचे ज्ञान.
गुरुकृपेने साधले,
जीवनाचे उच्च स्थान.
गुरुपौर्णिमाईच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरूंचा आशीर्वाद हवा.
जीवनाच्या या मार्गावर,
हेचि दान देगा देवा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूंच्या प्रेमाने पावन,
मन हे हर्षित होते.
तुमच्या कृपेने हे गुरू!
जीवन हे मोक्ष साधते।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूंच्या मार्गदर्शनाने,
मिळते शांती आणि स्फूर्ती,
गुरुकृपेने झाली,
प्रफुल्लित चित्तवृत्ती.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
नमन करतो चरणांना,
तुमच्या मार्गदर्शनाने,
आला अर्थ या जीवनाला।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कृतज्ञतेच्या शब्दांत,
नमन करतो तुम्हाला,
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी,
द्यावे शुभाशीर्वाद आम्हाला.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
प्रेरणेचा दीप उजळतो,
गुरुचे ज्ञान, शिक्षण
जीवनास नवा अर्थ देतो।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरुचे आशीर्वाद मागूया,
तुमच्या मार्गदर्शनाने,
जीवन आनंदाने भरूया।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा | Guru Purnima Quotes In Marathi For Teachers

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आई बाबानंतर जर आपल्या आयुष्यात कुणाचे उच्च स्थान असेल तर ते आपले शिक्षक आहेत. जे आपले जीवन घडवण्यासोबत आयुष्याला शिस्तही लावतात. त्यांच्या शिक्षणाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल होते. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. अशावेळी खास शिक्षकांसाठी खास शुभेच्छा (Guru Purnima Wishes To Teacher In marathi) पाठवून तुम्ही त्यांना आनंदी करु शकता. चला तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिक्षकांचे आभार मानूया (Teacher Guru Purnima Quotes In marathi)

Guru Purnima quotes in Marathi

शिक्षणाचे महत्व तुमच्यामुळेच समजले.
ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळले.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.

शिकवताना तुम्ही आम्हाला खूप दिलात मार,
तरीही केलेत प्रेम आणि दिला खूप आधार,
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा सर.

ज्यांनी मला प्रेरणा दिली आणि माझ्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण केली त्या सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर.

तुमच्या ज्ञानाची शक्ती नेहमीच मार्गदर्शन करते.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर.

तुमच्या शिक्षणाने मिळालेले ज्ञान आणि स्फूर्ती जीवनाला नवे अर्थ देते.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.

गुरुपौर्णिमा शुभेच्छा | Happy Guru Purnima | (Inspirational Guru Purnima quotes in Marathi)

Guru Purnima quotes in Marathi

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, गुरूंच्या मार्गदर्शनाने आपले जीवन यशस्वी होवो, हीच प्रार्थना.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असोत.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुकृपेने आपले जीवन सदा सुखमय होवो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या जीवनातील अडचणी कायम दूर होवोत आणि गुरुकृपेने तुन]मचे जीवन कायम आनंदी राहो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, आपल्या गुरूच्या प्रेरणेने आपले जीवन उज्वल होवो. त्यांच्या मार्गदर्शनाने आपली सारी स्वप्ने पूर्ण होवोत.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

हे ही वाचा: आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Ashadhi Ekadashi Wishes in Marathi)

आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Quotes For parents In Marathi )

आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरीही आई- बाबा हेच आपले पहिले गुरु असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा अर्थ लाभतो. त्यांच्याकडूनच तर आपण जीवन जगण्याचे धडे गिरवत असतो. माणसाच्या चांगल्या जडणघडणीत आई-बाबांचा वाट अनमोल असतो. म्हणूनच आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. (Guru Purnima Quotes for Mummy Papa)

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आई माझा गुरु,
आई कल्पतरू
गुरुपौर्णिमेच्या दिवशी
नमन करिते तुझे लेकरू.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आई.

माझे प्रेरणास्थान आणि माझे गुरू असलेल्या आईबाबांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरु तो असतो जो तुम्हाला शिकवतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवतो. माझ्यासारख्या दगडावर विश्वास ठेवून आयुष्यात कायम माझ्या सोबत असलेल्या आई-बाबांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

आई-बाबा, माझ्या आयुष्यातील दोन गुरू. मी जन्माला आल्यापासून जेव्हा-जेव्हा मला त्यांची गरज भासली तेव्हा-तेव्हा ते माझ्यासोबत उभे असतात. अशा माझ्या प्रिय पालकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने, मी माझ्या आई-वडिलांचे आभार मानतो की जे जीवनातील प्रत्येक सुखदुःखात कायम माझ्यासोबत मजबुतीने उभे राहिले. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आई-बाबा.

आई-बाबा, जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमचा आभारी आहे. तुमचे शुभाशीर्वाद कायम माझ्या सोबत राहूद्या.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिय आई आणि बाबा, तुम्ही दोघे माझे आदर्श आणि जीवन प्रेरणा आहेत. तुम्हा दोघांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

मी खरोखर भाग्यवान आहे की मला माझ्या आई-बाबांच्या रूपाने आयुष्यभरासाठी गुरु मिळाले. तुमच्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ मिळाला. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

मला आयुष्यात कधीही दिशाहीन वाटले नाही, कारण नेहमीच माझे आईबाबा मला योग्य दिशा दाखवतात. अशा मार्गदर्शक आई बाबांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.

स्वामी समर्थांसाठी गुरुपौर्णिमा कोट्स (Guru Purnima Quotes In Marathi For Swami Samarth)

अशक्यही शक्य करतील आपले स्वामी. स्वामी समर्थांचे देशापरदेशात अनेक भक्त आहेत. स्वामी समर्थांना अनेकजण आपले गुरु मानतात. त्यांनी अनेक लोकांना जगण्याची एक अनोखी दिशा आणि उर्मी दिलेली आहे. तर जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा शुभेच्छा. (Guru Purnima Quotes in Marathi for Swami Samartha)

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव लाभो. जय स्वामी समर्थ!

स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने आपले जीवन उज्ज्वल होवो आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व संकटे दूर होवोत. जय स्वामी समर्थ! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वामींच्या भक्तीत मन रमून जीवन आनंदाने भरू दे.
स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन, जीवन सुखमय आणि यशस्वी होवो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
जय स्वामी समर्थ!

स्वामी समर्थांच्या ज्ञानाने आपल्या जीवनाचा मार्ग उजळू दे.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.
जय स्वामी समर्थ!

स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन, जीवन यशाने सुगंधित बनो.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपले जीवन पावन होवो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
जय स्वामी समर्थ!

स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपले जीवन उज्ज्वल, सुखमय आणि आनंदी होवो, हीच समर्था चरणी प्रार्थना!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
जय स्वामी समर्थ.

मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Quotes In Marathi For Friends)

गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपले मित्र हे आपल्या जीवनातील खरे मार्गदर्शक आणि शिक्षक असतात. तर तुमच्या जीवनातील अशाच खास मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (guru purnima quotes in marathi for फ्रेंड्स)

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


मित्रा, दिलासा तू आधार मला,
जेव्हा होती मला तुझी गरज,
मानले तुला भावा,
मला तू आपला समज…
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रा, तू आहेस गुरूच्या जागी,
तुझ्यामुळे आयुष्याला अर्थ.
भीत नाही मी संकटाला, कारण
तू आहेस माझ्यासाठी समर्थ.
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा .

मित्र मला नेहमी
तुझ्या सल्ल्याचा आधार,
तुझ्यामुळे दूर झाले संकटाचे भार.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रा तुझ्या मार्गदर्शनाने,
जीवनात आलं समाधान,
तुझ्यामुले जीवनात,
मिळाले सुखाचे अमूल्य दान.
गुरुपौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा.

तुझ्या सल्ल्याने गोड झाला प्रवास,
सुखदुःखाच्या वाटेवर,
तुझ्या मार्गदर्शनाने मिळाले,
जीवनात नवे आनंदाचे शिखर.
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आभार मानतो तुझे,
दिवसेंदिवस आपली मैत्री वाढता वाढता वाढे.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.

तुझ्या शब्दांनी दिला विश्वास,
उभा राहिलो मी खंबीर,
तुझ्या सहकार्याने मिळाले,
जीवनात अनुभव नवीन.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
मित्रा तुझ्या सल्ल्याचा प्रकाश,
तुझ्यामुळे उजळले जीवन,
दूर झाले सर्व त्रास.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सुंदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Respect Guru Purnima Quotes In Marathi)

गुरुविना जीवन हे वैराण वाळवंटासारखे आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षणाने जीवनातील सर्व अडचणींना पार करून नवा मार्ग मिळतो. चला, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आदर करूया (Respect Guru Purnima Quotes In Marathi).

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी,
गुरूंना करतो त्रिवार वंदन,
आभार तुमचे कोटी कोटी,
तुमच्या कृपेने उजळले जीवन.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या ज्ञानाचा प्रकाश,
जीवनात नवा अर्थ देतो,
गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरूंना वंदन करतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो,
तुमच्या चरणी वंदन करतो,
तुमच्या कृपेने मिळो सन्मान,
गुरूंना माझा सादर प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरुचे मार्गदर्शन मिळो,
तुमच्या शिक्षणाने जीवनात,
नव्या यशाचा उगम होवो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरूंना आदराचा प्रणाम,
तुमच्या कृपेने दूर झाला,
जीवनातील अंधकार.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूपौर्णिमा शायरी मराठी (Guru Purnima Shayari In Marathi)

या गुरुपौर्णिमेला शायरीच्या माध्यमातून, आपण आपल्या गुरूंचे आभार मानूया आणि त्यांना सन्मान देऊया.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
गुरुचे सहकार्य,
तुमच्या कृपेने मिळाले,
जीवनात नवीन स्थैर्य.
हॅपी गुरुपौर्णिमा.

गुरुच्या शब्दांनी दिला,
संकटांतून सावरण्याचा मार्ग,
गुरूच्या सहवासाने मिळाले
संकटातही धैर्य.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
प्रेरणेचा दीप उजळतो,
गुरूच्या शिक्षणाने,
जीवनास नवे अर्थ देतो।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कृतज्ञतेच्या शब्दांत,
नमन करतो तुम्हाला,
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी,
आशीर्वाद द्यावे या पामराला।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुच्या शब्दांनी दिला आधार, दिला ज्ञानरुपी वसा,
झाली संकटे दूर, मिळाली जगण्याची नवी दिशा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

हे ही वाचा: आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Ashadhi Ekadashi Wishes in Marathi)

,

Leave a Reply