डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे (dark chocolate benefits in Marathi): काही वर्षांपूर्वी चॉकलेटचे काही निवडक प्रकारच उपलब्ध होते. पण आजकाल बाजारात सर्व प्रकारची चॉकलेट्स बघायला मिळतात. ‘डार्क चॉकलेट’ हे त्यापैकीच एक. बरं, सगळ्यांनाच डार्क चॉकलेट आवडतं असंही नाही. पण, डार्क चॉकलेटचे फायदे जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला डार्क चॉकलेट खायला आवडेल.
वास्तविक, डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण डार्क चॉकलेट हे काही कोणत्याही शारीरिक समस्येवर इलाज नाही. या समस्यांना रोखण्यासाठी आणि त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी हे काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.
येथे जाणून घ्या डार्क चॉकलेट खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे (dark chocolate benefits in Marathi)
डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर
डार्क चॉकलेटचे संतुलित प्रमाणात सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या धोक्यासाठी कारणीभूत असणारे घटक कमी होतात. यापैकी एक उच्च कोलेस्टेरॉल आहे.
डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले संयुगे एलडीएलपासून संरक्षण देतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
नैराश्यात आणि ताण-तणावात उपयुक्त
बहुतेक लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावांचा सामना करावा लागतो. सततच्या तणावामुळे नैराश्यही येऊ शकते. या समस्येमध्ये मूड बदलणे, दुःख, राग, चिडचिड अशी लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी किंवा मूड सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते.
डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक तणाव निर्माण करणारे कॉर्टिसॉल हार्मोन नियंत्रित करतात. हे चॉकलेट तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हे खाल्ल्याने तुमचा मूड सुधारतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे फायदेही दिसून येतात. संशोधनात असे दिसून आले आहे की कमी चरबीयुक्त आहारासोबत प्लांट स्टेरॉल्स आणि कोको फ्लेव्हॅनॉल असलेले डार्क चॉकलेट सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
डार्क चॉकलेट त्वचेसाठी उत्तम
डार्क चॉकलेटमध्ये असलेले बायोएक्टिव्ह संयुगे तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असू शकतात. यामध्ये असलेले फ्लेव्हनॉल्स सूर्यामुळे होणारे नुकसान टाळतात. त्वचेतील रक्त प्रवाह सुधारू शकतो आणि त्वचा घट्ट आणि हायड्रेटेड ठेवू शकतो.
हे ही वाचा : चिया सीड्स आणि सब्जामध्ये फरक काय?
सर्दी आणि खोकला प्रतिबंध
बदलत्या हवामानामुळे बऱ्याच जणांना सर्दी-खोकल्यासारखे किरकोळ आजार होतात. अशा परिस्थितीत सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. या पदार्थामुळे श्वसनसंस्थेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. या समस्यांमध्ये सर्दी, खोकला यांचाही समावेश होतो.
उच्च रक्तदाबासाठी डार्क चॉकलेटचा वापर
उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही डार्क चॉकलेट उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनात असे समोर आले आहे की डार्क चॉकलेटचा उच्च रक्तदाब वाढविणारा प्रभाव असतो, ज्यामुळे त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होतो.
मधुमेहामध्ये फायदेशीर
मधुमेहामध्ये चॉकलेटचे सेवन करणे काही प्रमाणात फायदेशीर असते. हे वाचताना विचित्र वाटू शकते परंतु अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कोको-समृद्ध डार्क चॉकलेटची निरोगी मात्रा या आजारामध्ये खरोखर फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात उपस्थित पोषक घटक शरीरात ग्लुकोजचे चयापचय करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या शरीराची इन्सुलिनबद्दलची संवेदनशीलता (insulin resistance) सुधारून मधुमेहासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
डार्क चॉकलेट खाण्याचे तोटे (Disadvantages of eating dark chocolate)
डार्क चॉकलेट खाण्याचे जसे फायदे (डार्क चॉकलेट बेनिफिट्स) आहेत तसे काही तोटेदेखील आहेत. त्यामुळे त्याचे फायदे (benefits of eating dark chocolate) जाणून घेतल्यानंतर लोकांनी त्याचे जास्त सेवन करू नये, म्हणूनच आम्ही येथे डार्क चॉकलेट खाण्याचे तोटे देखील देत आहोत. खरं तर, डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे आणि थिओब्रोमाइन नावांचे घटक असतात, ज्यांचे जास्त सेवन केल्याने खालीलप्रमाणे काही समस्या निर्माण होऊ शकतात.
- अस्वस्थ वाटणे
- निद्रानाश होणे
- वजन वाढणे
- डोकेदुखी किंवा मायग्रेन
- चक्कर येणे
- डिहायड्रेशन होणे
- हृदयगती जलद होणे
- पोटात मळमळ वाटणे
- पिंपल्सची समस्या उद्भवणे
- छातीत जळजळ वाटणे
निष्कर्ष (Conclusion)
डार्क चॉकलेट खाण्यामुळे अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने तुमचे हृदय, रोगप्रतिकारक शक्ती, मूड आणि एकूणच आरोग्याला फायदा होऊ शकतो. पण ते जर जास्त प्रमाणात खाल्ले गेले, तर त्याचे तोटेही तितकेच होऊ शकतात. त्यामुळे ते कमी प्रमाणात खाणे उत्तम. पण आपल्या आरोग्यासाठी काहीही खाण्यापूर्वी त्याचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
हे ही वाचा : चिया सीड्स आणि सब्जामध्ये फरक काय?