Ashadhi Ekadashi Wishes in Marathi 2024: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. आषाढी एकादशी म्हटले कि डोळ्यासमोर येतो तो वारकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय, टाळ मृदुंगाचा पवित्र गजर, विठ्ठल नामाचा बेफान करणारा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पायी चालणाऱ्या दिंड्या, भोळ्या भाविकांची विठ्ठल भेटीची आस आणि विठ्ठल माऊलीचे विलोभनीय रूप. हिंदू दिनदर्शिकेनुसार एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. त्यापैकी आषाढ महिन्यात, शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.
आषाढी एकादशी कधी आहे? (When is Ashadhi Ekadashi 2024)
यंदा (2024) आषाढी एकादशी १७ जुलैला येत आहे.
या दिवशी भक्त पंढरपूरला जातात आणि विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याचा आनंद काही औरच असतो. या लेखात आपण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा संदेशांबद्दल (Ashadhi Ekadashi wishes in Marathi) जाणून घेऊया.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi)
पालख्यांचा सोहळा…
वारकऱ्यांचा मेळा…
विटेवर उभा शोभे
सख्या पांडुरंगा…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठलाची कृपा, सर्वांवर सदैव राहो।
विठ्ठलाच्या नामाने, मंगलमय जीवन होवो॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीच्या, पवित्र या दिवशी।
नतमस्तक होऊ, विठ्ठलाच्या चरणी॥
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
बा विठ्ठला…
तुझ्या पायी वीट
देखील भाग्यवंत आणि
मी कायम गरजवंत!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठलाच्या चरणी, भक्तांचे मनी प्रेम।
विठोबाच्या दर्शनाने, झाले अवघेचि क्षेम॥
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
सोहळा पालख्यांचा …
मेळा वारकऱ्यांचा …
पंढरपुरी आहे माझा…
गाभा चैतन्याचा …
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
करिता गजर विठ्ठल नामाचा
क्षणार्धात हरे चिंता, व्यथा…
सोडी अहंकार, सोडी हा संसार,
आतातरी क्षेम दे बा विठुराया…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
आषाढीच्या पवित्र दिवशी, पंढरीला जाऊ।
विठ्ठलाच्या चरणी, नतमस्तक होऊ॥
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
पंढरीची वारी,
जगण्याचे बळ देई…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढीची येता वारी,
होती उत्साही वारकरी,
दरवळे भक्तीचा सुगंध
माझ्या विठ्ठलाच्या चरणी…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर,
आषाढीची वारी, एकादशीचा सण,
माउलीच्या दर्शनाने,
मने आनंदी बेफान..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानेश्वर, तुकाराम, संतांची माया,
विठ्ठलाच्या चरणी भक्तीची छाया|
पांडुरंगाच्या प्रेमात न्हालो,
तयासाठी पंढरपुरी चाललो।|
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
माऊलींच्या ओव्या, अभंगांचा रंग,
विठ्ठल भक्त हरिपाठात गुंग,
माउली दर्शनाचा बांधला हा चंग,
‘विठ्ठल विठ्ठल’ हाच खरा मंत्र।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशी आली,
वारकरीच्या ओठी विठ्ठलाची गाणी,
पंढरपूरच्या वाटेवर चालत,
विठ्ठलाच्या प्रेमात रंगली वारी।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
एकादशीच्या निमित्ताने,
पूजावे विठ्ठलाला मनोभावे,
माऊली चरणी नतमस्तक होऊन,
गावे भक्तीने गोडवे।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठलाच्या भक्तांच्या मनात,
आषाढी एकादशीचे सुंदर स्वप्न,
पंढरपूरच्या वाटेवर चालत,
विठ्ठल प्रेमात रंगलेले भक्त।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
हृदयी माझ्या बिंबली सावळी ती मुर्ती
दर्शने मात्रे देहो बुद्धी पालटली
धन्य माझा देव धन्य माझा भाव
वसे हृदयी पंढरीनाथ
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
टाळ वाजे वाजे मृदुंग
वाजे हरीची वीणा
वारी निघाली पंढरीला
मुखाने हरिनाम बोला
जय जय राम कृष्ण हरी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीचा सण,
भक्तांच्या आनंदाचा क्षण,
प्रेमाने गातात अभंग,
करुनी हरीनामाचा गजर।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
सकाळ साजिरी हसरी असावी
मुर्ती विठूरायाची मजला दिसावी,
सदा मुखी असावे हरीनाम
सोपे होईल तयाचे काम
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
“अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.”
आषाढी एकादशीचा सण आला,
वारकऱ्यांच्या मनी उत्साह फुलला,
विठ्ठलाच्या चरणी जाऊन,
भक्त हरिप्रेमात रंगला।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
ध्वज फडकले भगवे,
मनात भक्तीचे पवित्र भाव,
मोक्षाच्या वाटेवर,
लागतॊ विठ्ठलाचा गाव।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठलाच्या प्रेमात, जीवन होवो आनंदी।
विठ्ठलाच्या कृपेने, लाभे मनःशांती॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
सुखालाही आला,
हो आनंदाचा पूर|
चालला हरीनामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर!!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठल दिसे ठाई ठाई|
भक्त लीन भक्तीपाई||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
चैतन्याचा गाभा…
विटेवर उभा
दिव्य, अमृततुल्य
विठुरायाची आभा..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर,
आषाढीची वारी, एकादशीचा सण,
अभंग, टाळ मृदुंगाची धून
माउली दर्शने आनंदी झाले मन|
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
ज्ञानेश्वर, तुकाराम, संतांची माया,
विठ्ठलाच्या चरणी भक्तीची छाया,
पांडुरंगाच्या प्रेमात न्हालो,
त्याच्यासाठी पंढरपूरी निघालो।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
एकादशीच्या निमित्ताने,
पूजावे विठ्ठला मनोभावे,
तयाचरणी नतमस्तक होऊन,
गावे हरीभक्तीचे गोडवे।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशी आली,
साऱ्यांच्या ओठी विठ्ठलाची गाणी,
पंढरपूरच्या वाटेवर चालत,
हरी प्रेमात रंगली वारी।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठोबासी शरण जावे
सदा नाम त्याचेच गावे||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशी स्टेटस (Ashadhi Ekadashi Status In Marathi)
माऊलीच्या कृपेने होतो सर्व दुःख दूर, विठोबाच्या भक्तीत गवसतो जीवनाचा सूर। जय हरी विठ्ठल.
विठ्ठल नामाचे महत्व अपरंपार, तया नामात जीवनाचे सार. राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
पंढरीच्या वारीला भक्तांचा मेळ, तयासाठी विठुराया मांडीला हा खेळ. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
माऊलीच्या भक्तीत हरपले भान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
माऊलीच्या भक्तीत हरवतो सर्व त्रास, नामस्मरणें होईल दुःखांचा नाश. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढीच्या पावसात पंढरीची वारी, मुखाने बोला रामकृष्ण हरी. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
भक्ती पाहुनी विठू वेडावला, वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला… जय हरी विठ्ठल!! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi)
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद आणि प्रेम फुलो. विठ्ठलाची कृपा आपल्यावर सदैव राहो. जय विठ्ठल!
विठोबाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात शांती आणि समाधान नांदो. विठ्ठलाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आनंद आपल्या जीवनात सदैव फुलत राहो. विठ्ठलाच्या चरणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत. जय विठ्ठल!
आषाढी एकादशीच्या पावन दिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होवून त्याच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि अडचणी दूर होवोत. जय हरी विठ्ठल!
विठ्ठलाच्या नामस्मरणाने तुमचे जीवन पवित्र होवो आणि पंढरीच्या वाटेवर चालताना, तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
विठोबाच्या कृपेने तुमच्या जीवनात नवा प्रकाश येऊन तुमचे जीवन उजळू दे. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकाशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या भक्तीत तुमचे मन रमू दे, आणि तुम्हाला शांती लाभू दे. आषाढीएकादशीनिमित्त तुम्हाला मंगलमय शुभेच्छा.
विठुरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. जय हरि विठ्ठल! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
Pingback: Guru Purnima Quotes in Marathi 2024 | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Help Diva