मी प्रेग्नन्ट आहे!!! | मराठी कथा

मी प्रेग्नन्ट आहे!!! | मराठी कथा

Free Pregnant Pregnancy photo and picture

माझे नाव आयुष आहे. आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. माझे एका मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम आहे. त्या मुलीचे नाव प्रिया आहे. प्रिया माझ्या घराच्या शेजारीच  राहते. मी पहिल्यांदा तिला पहिले तेव्हाच

मी तिच्या प्रेमात पडलो. ती त्यावेळेपासून माझं पाहिलं प्रेम आहे, जेव्हा मला प्रेम म्हणजे काय हे माहितही नव्हतं. प्रियाच्या वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले. ती तिच्या आईसोबत तिच्या मामाच्या घरी राहायला आली.

तिचे मामा आमच्या शेजारीच राहतात. वडील गेल्याचा प्रियाला एव्हढा धक्का बसला कि तिला काही दिवस बोलताही येत नव्हते. ती तिच्या मामालाच पप्पा म्हणून हाक मारत होती. अशीच दहा वर्ष निघून गेली. आता आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. प्रिया माझ्याशी अनेक गोष्टी शेअर करते.

पण मी अजूनही तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली नाहीये. प्रियाला लहानपणापासूनचऍक्टिंग ची आवड होती आणि तिला मुंबईत जाऊन अभिनेत्री बनायचे स्वप्न होते. त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिला पैशाची मदत केली. तिने तिच्या घरच्यांची समजूत घातली आणि मी तिला मुंबईला नेऊन सोडले. मुंबईत तिचा राहण्याचा बंदोबस्त केला.

ही मराठी कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

प्रियाने तिचे स्वप्न पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मीही तिला मदत करत आहे. पण मुंबईत अभिनेत्री होणे इतके सोपे नाहीये. प्रिया 3 वर्षांपासून मुंबईत आहे. पण अजूनही स्ट्रगलिंग ऍक्टर म्हणूनच काम करत आहे.

तरीही अजून तिची हिम्मत हरली नाहीये. म्हणूनच अजूनही ती चिकाटीने मुंबईत टिकून आहे. मी अधून मधून तिला भेटायला जातो. माझाही माझ्या घरच्या व्यवसायातचांगलाच जम बसला आहे. घरचे माझ्या लग्नासाठी माझ्या पाठी लागले आहेत. माझे मित्रही मला सांगत असतात की मी आता प्रियाला प्रपोज करावे.

शेवटी मीही प्रियाला प्रपोज करायचे ठरवले. एका रात्री मी प्रियाला फोन केला. पलीकडून ती हॅलो म्हणाली. पण ती थोडी गोंधळलेली वाटत होती. “हॅलो आयुष, तू कुठे आहेस? कुठे आहेस? ” “अगं प्रिया! कुठे आहेस म्हणजे काय? मी माझ्या घरी आहे.” मी म्हणालो. यावर ती म्हणाली,”घरी? मी तर तुला घ्यायला एयरपोर्टवर आले आहे.” “एयरपोर्ट? अगं काय बोलतेस?” मी न कळून विचारले. “अरे तू तर येणार होतास ना मुंबईला?” प्रिया म्हणाली.

तिचे प्रश्नच मला कळत नव्हते. “मी येणार तर नव्हतो मुंबईला. पण मी मुंबईला यावे असे तुला वाटते का?” मी तिला विचारले. “हो! हो! तू ये ना आयुष.” ती कळवळून म्हणाली. हे ऐकून मला मनात गुदगुल्या झाल्या. मी म्हणालो, “मला तुला काही सांगायचे आहे. आय लव्ह यू प्रिया!” यावर प्रियानेदेखील ‘आय लव्ह यू आयुष’ असे म्हटले आणि माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही.

मी तिला आनंदाच्या भरात बोललो कि मी उद्याच मुंबईला येतो आहे. त्या दिवसापासून मी प्रेमाच्या धुंदीतच होतो. दुसऱ्या दिवशी मी प्रियाला मुंबईत जाऊन भेटलो. भेटताक्षणी तिने मला घट्ट मिठी मारली आणि,”मला पुन्हासोडून कधी जाऊ नकोस,” असे म्हणाली. “अगं हो हो हो! “मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.”  मी माझ्या घरी प्रियाबद्दल सांगितले.

माझ्या घरच्यांनाही प्रिया आवडत होतीच. लवकरच माझे आई-बाबा प्रियाच्या आई आणि मामाला जाऊन भेटले. त्यांनाही फार आनंद झाला. माझे बाबा गुरुजींकडे माझ्या लग्नाची तारीख काढायला गेले आणि नेमकी ३ दिवसानंतरचीच तारीख निघाली. ३ दिवसात आयुषचे लग्न झाले नाही तर त्याच्या पत्रिकेनुसार पुढचे एक वर्ष तरी त्याला लग्न करता येणार नाही असे गुरुजी म्हणाले.

प्रियाची काही अजून एक वर्ष थांबण्याची तयारी नव्हती. म्हणून मी बाबांना म्हणालो कि करूयात तीन दिवसात लग्न. दोन्हीकडच्या मंडळींची खूप घाई घाई झाली. माझे आईबाबा आणि तिची आई आणि मामा आमच्या या निर्णयावर अजिबात खुश नव्हते.

पण आम्ही घाई केल्यामुळे सगळ्यांचाच नाईलाज झाला. मी मात्र जाम खुश होतो. माझे १० वर्षांपासूनचे प्रेम आता मला मिळणार होते. प्रियाच्या डोळ्यातही मला वेगळंच प्रेम दिसत होतं. मी हे आधी कधीच पाहिले नव्हते. अखेर आमचे लग्न झाले. लग्नाची पहिली रात्र! मधुचंद्र!!! हे सर्व खरे आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

प्रिया माझ्या बेडवर होती. मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करताच प्रिया उठून माझ्याजवळ आली. प्रिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली,”आयुष मला तुला काहीतरी सांगायचे आहे. जे मी तुला एयरपोर्टवर भेटून सांगणार होते.” “एयरपोर्टवर? काय?” आणि मग तिने जे मला सांगितले, ते ऐकून माझ्यावर आभाळ कोसळले.

ती म्हणाली,”आयुष, आय एम प्रेग्नन्ट! मी तुझ्या बाळाची आई होणार आहे.” हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते आणि हे बोलून तिने मला घट्ट मिठी मारली. काय? पण हे खरे कसे असू शकते? आम्ही तर मिठी सुद्धापहिल्यांदी मारत होतो, हे मूल माझे कसे असेल? आणि प्रिया माझ्याशी खोटे का बोलत आहे?? त्या रात्री प्रिया माझ्या खांद्यावर डोके ठेवून काय काय बडबडत होती देव जाणे! मी तर पूर्णपणे सुन्न झालो होतो.

माझी अवस्था वाईट होती. हे लग्न करायला प्रियाने घाई का केली ते आता मला  समजले. प्रियावर माझं खूप प्रेम होतं. पण तिने आता मला मूर्ख बनवले होते. माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला होता. पण जेव्हा जेव्हा प्रिया हे बोलायची कि हे बाळ माझे आहे तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र सत्य दिसायचे. तिचे डोळे खोटं बोलत नव्हते. मी तर पूर्णपणे कन्फयुज झालो होतो. मात्र ती फार खुश होती. घरच्यांना तरी मी काय सांगणार होतो?  मी हे कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार होतो.

मग एके रात्री न राहवून मी प्रियाला विचारले, “प्रिया, हे सर्व काय चालले आहे? हे मूल कोणाचेआहे?” ती आश्चर्याने म्हणाली, “आयुष, तू माझी मस्करी करतोयस का? हे बाळ तुझंच तर आहे. असं काय विचारतोयस? मी म्हणालो,”प्रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू खरं सांग, हे मूल कोणाचे आहे? मी या मुलाला दत्तक घेईन, माझे नाव देईन. पण खरं तर सांग.” प्रिया आता रडायला लागली आणि म्हणाली, “असे काय म्हणतोयस आयुष? ,माझ्याबद्दल असा का विचार करतोस? काय म्हणायचे आहे तुला? मी काय तुलाफसवले आहे का? मी काय खोटारडी आहे का?”

हे ऐकून मला फार वाईट वाटले. मात्र त्या रात्री माझा धीर सुटला आणि मी प्रियाला घर सोडून जायला सांगितले. त्याच क्षणी प्रिया रडत रडत तिच्या आईच्या घरी गेली. आता हे प्रकरण आमच्या दोघांच्याही घरांमध्ये माहीत झाले. प्रिया माझ्या प्रेमाचा फायदा घेत होती. माझे आईबाबा तर डोकंच पकडून बसले. असेच २-३ दिवस गेले.

एके दिवशी सकाळी एक साधारण ५० – ५५ वयाची महिला प्रियाचा पत्ता विचारत माझ्या घरी आली. मी म्हणालो ती माझी पत्नी आहे, पण ती सध्या तिच्या माहेरी गेली आहे. मी त्या महिलेला विचारले की त्यांचे काम काय आहे? यावर त्या म्हणाल्या की त्या अपघातानंतर प्रिया अचानक त्या रात्री एयरपोर्टवरून निघून गेली.

मला विचारायचे होते की ती ठीक आहे ना? मी आश्चर्यचकीत होऊनविचारले कि कसला अपघात? त्याम्हणाल्या,” हा माझा मुलगा आयुषचा अपघात होता. आयुष? नाव ऐकून मी गडबडलोच. त्या पुढे म्हणाल्या,”हो, माझा मुलगा आयुष आणि प्रिया एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लवकरच लग्न करणार होते. त्यासाठी प्रियाला भेटण्यासाठी मी आणि आयुष मुंबईला आलो होतो. प्रिया आम्हाला रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टला आली होती. पण रस्ता ओलांडत असताना माझा मुलगा मला वाचवण्यासाठी एका मोठ्या बसखाली आला. हा अपघात इतका भीषण होता की, जागच्या जागीच आयुषचा मृत्यू झाला. माझी तर शुद्धच हरपली. प्रिया तिथून कधी निघून गेली काही कळालेच नाही. आता इतक्या दिवसानंतर मी थोडी सावरले आणि प्रिया ठीक आहे कि नाही ते बघायला आले.” 

आयुषच्या आईचेबोलणे ऐकताच माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि प्रिया इतके दिवस इतकी विचित्रपणे का वागत होती ते समजले. ती ज्या व्यक्तीवर प्रेम करत होती त्याचे नाव देखील आयुष  होते. आणि तो तिच्या डोळ्यासमोर मरण पावला. याचा तिला जबर धक्का बसला आहे. ती हे मानायलाच तयार नाही कि आयुषचा मृत्यू झालाय.

माझ्या आणि आयुषच्या नावातील साम्यतेमुळे ती ह्या धक्क्यात मला तिचाच आयुष समजत आहे आणिहे बाळ आयुष तुझेच आहे असे बडबडत आहे. जसे लहानपणी वडिलांच्या मृत्यूच्या मानसिक धक्क्यामुळे ती तिच्या मामांनाच पप्पा समजत असे. मी पण नेमकेच तिला ती एयरपोर्टवर असतानाच फोन करून प्रपोज केले. त्यावेळी ती जबरदस्त शॉक मध्ये होती. म्हणूनच ती काहीबाही बडबडत  होती. तिच्या डोळ्यातील प्रेम या आयुषसाठी नसून त्या आयुषसाठी आहे.

ह्या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर मला प्रचंड वाईट वाटले. मी ताबडतोब प्रियाच्या माहेरी गेलो आणि तिला सॉरी म्हणालो. प्रियादेखील रडू लागली आणि म्हणाली,”ह्या अवस्थेत तू मला खुश ठेवायला हवे आणि तू मला रडवतोयस? तुला रडताना बघून मलापण रडू येते. प्रियाच्या या अवस्थेचं काय करावे मला समजत नव्हते.

मी तिला लबाड म्हणत होतो, पण तिला स्वतःलाच समजत नव्हते कि ती कोणत्या मानसिक अवस्थेत आहे. मी प्रियाची समजूत घातली आणि तिला माझ्यासोबत परत घेऊन आलो. आता मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो. मला माहित आहे की ती दुसऱ्या आयुषवर प्रेम करत होती, माझ्यावर नाही. पण मी तिच्यावर प्रेम करतो. आणि सध्या मी तिला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही.

प्रिया आता माझी आहे आणि तिचे मूलही माझे आहे. आता मला फक्त प्रियाला आनंदी ठेवायचे आहे. पुढे काय करायचे आणि प्रियाला यातून  बाहेर कसे काढायचे हा नंतरचा विषय आहे. पण मला विश्वास आहे की माझे प्रेम प्रियाला काहीही होऊ देणार नाही.

समाप्त

Leave a Reply