फेक प्रोफाईल! | Marathi Love Story

फेक प्रोफाईल! | Marathi Love Story

Free Mask Eyes photo and picture
Marathi Love Story

माझे नाव सोनिया आहे. मी सध्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आमच्या घरात मी, माझे आईबाबा आणि माझी एक मोठी बहीण मोनिका दीदी असे चार सदस्य आहोत. मोनिका दीदीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता तिला आता दुसऱ्या शहरात चांगली नोकरीही मिळाली आहे. घरचे आता तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत आहेत. माझ्याही आयुष्यात एक मुलगा आहे, रोहन. आम्ही सोशल मीडियावर भेटलो. पूर्वी मला असं वाटायचं कि सोशल मीडियावर प्रेम कसं होऊ शकतं? परंतु २ महिन्यांपूर्वी रोहनशी चॅटिंग करायला सुरवात केली, आणि त्याच्या प्रेमात कधी पडले ते मलादेखील समजले नाही. आता मला कळले की प्रेम कुठेही, कुणाशीही होऊ शकते. त्याचे असे झाले, २ महिन्यांपूर्वी रोहनची फ्रेंड रिक्वेस्ट माझ्या सोशल मीडियावर आली. सहसा मी अशा रिक्वेस्ट पटकन स्वीकारत नाही पण रोहनचा प्रोफाईल फोटो खूप अट्रॅक्टीव्ह  होता. प्रोफाईलनुसार रोहन हुशार आणि उच्चशिक्षित होता, त्यामुळे त्याला माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये जोडायला मला वेळ लागला नाही. पूर्वी आमच्यात चॅटींग व्हायची आणि आम्ही मेसेजच्या माध्यमातून बोलायचो. यादरम्यान त्याने माझा नंबर कधीच विचारला नाही. पण त्याने माझा नंबर मागावा अशी माझी फार इच्छा होती.  मला त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायचे होते. पण मुलगी असल्याने स्वतःहून त्याचा फोन नंबर मागणे मला ऑकवर्ड वाटत होते. तरीही एके दिवशी मी त्याला विचारले, “तुला माझा आवाज ऐकायचा नाही का? तू माझा फोन नंबर कधीच मागितला नाहीस.” तो म्हणाला,”मला तुझा फोन नंबर हवा होता, पण तुला वाईट वाटू नये म्हणून मी कधी मागितला नाही.” मग आम्ही दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. आता आम्ही दोघेही फोन वर बोलू लागलो. जवळपास १ महिना आम्ही एकमेकांशी बोलत होतो. एके दिवशी माझ्या घरातील सगले लोक बाहेर गेले होते. मी रोहनला म्हणाले,”घरात आता कुणीच नाहीये. आपण विडिओ कॉल करूयात का?” मात्र नेमकेच त्याच्या घरी नीट नेटवर्क नव्हते. मी त्याला विडिओ कॉल केला तेव्हा फक्त त्याचा आवाज येत होता. चेहरा काही दिसत नव्हता. त्यानंतर विडिओ कॉल डिस्कनेक्ट झाला. मग आम्ही फक्त फोनवरच बोललो. रोहन सुद्धा आता माझ्या आयुष्याचा एक भाग झाला होता.आम्ही रोज रात्री तासनतास गप्पा मारायचो. पुढच्याच महिन्यात माझ्या फायनल इयरच्या एक्साम्स होत्या. आता मलाही माझ्या बहिणीसारखी नोकरी करायची होती. पुढच्याच महिन्यात माझ्या एक्साम्स संपताच मोनिका दीदी सुट्टी घेऊन घरी आली आणि आम्हाला सरप्राईज दिले. दीदीने आई आणि बाबांना सांगितले की तिला कोणीतरी आवडते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहेत आई बाबा म्हणाले. बाबांनी विचारले,”कोण आहे तो? काय नाव त्याचे आणि तो काय करतो?” दीदी म्हणाली,”अरे हो हो! किती प्रश्न? मी उद्याच त्याला बोलावते. मग तुम्ही प्रत्यक्षातच त्याच्याशी बोला.” आई बाबा म्हणाले, ” ठीक आहे. त्याला घरी बोलाव.” हे मी रात्री रोहनलाही सांगितले. तोही हे ऐकून फार खुश झाला. घरात दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तयारी सुरू होती. आम्ही सगळे त्याची वाट बघत होतो. रात्री मी दीदीला विचारलं,”दीदी, कोण आहेत माझे होणारे जीजू?” दीदी म्हणाली,”उद्या तू त्यांना प्रत्यक्षात बघशीलच. पण तुला जर त्यांच्याशी बोलायचे असेल तर तू बोलू शकतेस.” दीदींनी मला त्यांचा फोटो दाखवला नाही फक्त रात्री काही वेळ फोनवर बोलायला लावलं. मी पण म्हटलं की उद्याच भेटू. शेवटी माझे होणार जीजू आणि त्यांचे आईबाबा आले. मी आणि बहिण अजून किचन मध्ये होतो आणि ती लोक हॉल मध्ये येऊन बसले होते. मी बाहेर जाऊन त्यांना पाहिले. पण त्या मुलाला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

ही Marathi Love Story आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

तो दुसरा कोणी नसून रोहन होता. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहताच बसले. रोहनने माझ्याकडे पाहिलं पण त्याने मला ओळख दाखवली नाही. जणू काही तो मला ओळखताच नव्हता. माझी दीदी रोहनशी लग्न करणार होती जो माझ्याशी अनेक महिन्यांपासून बोलत होती. आम्ही ऑनलाइन डेटिंग करत होतो. रोहन माझा ऑनलाईन बॉयफ्रेंड होता. मी आत जाऊन त्याच वेळी रोहनला फोन केला पण त्याचा नंबर बंद होता. आईबाबांना रोहन फार आवडला आणि त्याच्या आईबाबांना माझी दीदीदेखील आवडली. रोहन तर माझ्याशी ओळख नसल्यासारखे वागत होता. बघण्याचा प्रोग्रॅम आटपल्यावर रोहन आणि त्याचे आईबाबा निघून गेले. जाताजाता त्यांनाही मुलगी पसंत आहे असे सांगून गेले. दीदीला आणि आईबाबांना खूप आनंद झाला. घरच्यांना रोहन आवडला पण मी दीदीला याबद्दल सांगू की नाही या संभ्रमात मी होते. मी रात्री रोहनला फोन केला पण फोन पुन्हा बंद झाला आणि त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले होते. मी ज्याच्या प्रेमात पडले होते, तोच आता माझ्या मोठ्या बहिणीशी लग्न करणार होता. मला दीदीला ही गोष्ट सांगावीशी वाटली, पण तिला आणि आईबाबांना खुश बघून त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी आता दीदीच्या आनंदासाठी सर्व विसरायचे ठरवले. त्या रात्री मी माझे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले. आता कुटुंबीय दीदीच्या लग्नाची जोरदार तयारी करत होते. घरात लग्नाचे वातावरण निर्माण होऊ लागले होते. पण मी मात्र उदास होते. रोहन अधून मधून आमच्या घरी यायचा. पण मी त्याच्याशी फारशी बोलत नसे. दीदीला ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने मला विचारले,”काय झाले सोनी? आजकाल गप्प गप्प असतेस?” मी म्हणाले,”काही नाही दीदी. जरा फायनल इयरच्या रिझल्टचे टेन्शन आहे.” यावर दीदी म्हणाली,”सोनी, मी काय तुला आज ओळखते काय? काय झाले? तू रोहनशीदेखील फारसे बोलत नाहीस? तो तुला आवडत नाही का? मी बघते आहे, जेव्हापासून तू रोहनला पहिले आहेस तेव्हापासूनच तू फार शांत आहेस. त्याला भेटण्यापूर्वी तर तू खूप बोलायचीस. आता काय झालेय ग तुला? सांग ना मला. तुझ्या मोठ्या दीदीला नाही सांगणार का?” दिंडीचे बोलणे ऐकून मला रडू आले आणि रडत रडत मी तिला सारी हकीकत सांगितली. दीदी एकदम आश्चर्यचकित झाली होती. तीच यावर विश्वासच बसत नव्हता. पण तिला माहीत होते की मी कधी खोटं बोलत नव्हते. शेवटी दीदीने रोहनला भेटायला बोलावले आणि मीही तिच्यासोबत गेले. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. दीदीचा चेहरा उदास होता. रोहन येताच हॅलो म्हणाला. दीदींनी त्याला थेट सांगितलं,”सोनियाने मला सगळं सांगितलं आहे.” रोहन अजूनही मला ओळखत नसल्यासारखा वागत होता. दीदी पुढे म्हणाली, “तू सोनीयाला ऑनलाइन डेट केलेस आणि तेही 2 महिने.”

हे ऐकून रोहन आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ गप्प राहिला आणि मग त्याने एक गोष्ट सांगितली ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. रोहनने सांगितले की, सोनियाला ऑनलाईन डेट करणारा तो नसून त्याचा कुक होता. त्याच्या घरी एक मुलगा यायचा, त्याचा कुक राजू, जो त्याच्यासाठी आणि त्याच्या रूममेटसाठी जेवण बनवायचा. रोहन घरी नसताना राजू स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्या घरी यायचा. स्वयंपाक झाल्यावर राजू, रोहनचा लॅपटॉप त्याचा नकळत घ्यायचा. त्या मुलाने सोशल मीडियावर एक फेक आयडी तयार केला होता ज्याला त्याने रोहनचे नाव दिले होते आणि त्याचा फोटो टाकला होता. रोहनला याबद्दल काहीही माहिती नव्हते. एक दिवस तो नेमकेच ऑफिस मधून लवकर घरी आला आणि त्याने पहिले कि राजू त्याचा लॅपटॉप वापरात होता. त्याने राजुला ह्याबद्दल विचारले असता, भावाचं रिझल्ट अर्जेंटली बघायचा होता म्हणून लॅपटॉप वापरला असे सांगितले. रोहनला ही ह्याबद्दल काही शंका आली नाही. मात्र एक दिवस राजू त्याच्या फेक प्रोफाईल मधून लॉगऑऊट करायचे विसरला आणि त्याचे बिंग फुटले. रोहनने पहिले कि राजुने त्याच्या नावाने फेक अकाउंट तयार करून अनेक मुलींशी चॅटिंग केले होते. त्याने राजुला ह्याबद्दल जाब विचारताच राजू जॉब सोडून गावी पळून गेला. रोहनने मग त्याच्या नावे असलेले फेक अकाउंट डिलीट करून टाकले. हे सारे ऐकून मी आणि माझी दीदी दोघीही एकदम अवाक झालो होतो. “आणि मग ते फोन कॉल्स? माझ्याशी फोनवर कोण बोलायचे मग?” मी न राहवून विचारले. रोहन म्हणाला,”अगं, तो राजुचा होता. तो फक्त तुझ्याशी नाही तर बरीच मुलींशी फोनवर बोलायचा. तुम्हा दोघींना हे खोटं वाटत असेल तर माझ्या रूममेटला विचारा.” हे सारे ऐकताना मला फार वाईट वाटत होते, पण मनाला कुठेतरी एक दिलासा पण मिळत होता कि कमीत कमी माझ्या दीदीसोबत तरी फसवणूक झाली नव्हती. रोहन एक सच्चा मुलगा होता. आता माझ्या दीदीच्या चेहऱ्यावरील टेन्शन पण दूर झाले होते. सारे गैरसमज आता संपले होते. बरे झाली ही गोष्ट वेळेतच रोहनच्या ध्यानात आली, नाहीतर माझ्या आयुष्यात अजून पुढे काय काय झाले असते देवाचं जाणे! “आता वेडाबाई, या गोष्टीचा विचार करायचा नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आता चॅटिंग-बिटिंग सोडून करीयरवर लक्ष केंद्रित कर. सोशल मीडिया हे फसवे मायाजाल आहे. तिला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचे हे आता तुझ्या ध्यानात आलेच असेल.” दीदी मला म्हणाली. “हो दीदी. रोहन जीजू मला माफ करा. मी तुमच्यावर अकारण संशय घेतला.” मी कळवळीने म्हणाले. “ते ठीक आहे. पण मी तुला असाच सोडणार नाही. शिक्षा म्हणून तुला आजच्या आपल्या डिनरचे बिल भरावे लागेल.” रोहन खळखळून हसत म्हणाला आणि आम्ही दोघीही सगळे विसरून त्याच्या हसण्यात सामील झालो.

समाप्त

Leave a Reply