अधुरे प्रेम! | मराठी story | मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा

अधुरे प्रेम! | मराठी story | मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा

हृदयस्पर्शी कथा

प्रेम ही अशी भावना आहे, माणसाला नवसंजीवनी देते.

प्रेम म्हणजे ती भावना. ज्यात मन हरवून जावंसं वाटतं. मला ही भावना तुमच्याशी शेअर करायची आहे.

संध्याकाळ झाली होती मी दादर स्टेशनच्या बाहेर माझ्या मित्राची वाट पाहत होतो.

आमचा टाउन मध्ये जायचा प्लॅन होता आणि मी लवकर पोहोचलो होतो. तितक्यात मित्राचा फोन आला. त्याला काही कारणाने यायला उशीर होणार होता.

काय टाईमपास करावा समजत नव्हते. मी स्टेशन जवळ जाऊन बसलो, मग असे काही घडले की माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले.

मी स्टेशनच्या दिशेने बघत होतो, तेवढ्यात माझी नजर तिथे उभ्या असलेल्या एका मुलीवर पडली.

आणि तो एक असा क्षण होता, जिथे काळ पूर्णपणे थांबला होता. मी कुठे होतो, का होतो हेच मी पूर्ण विसरून गेलो होतो.

माझी नजर त्या मुलीवरून हटू च  शकली नाही. मी तिच्याकडे बघतच राहिलो.

तिचा निरागस चेहरा, तिचे बाहुलीसारखे छोटे छोटे डोळे, तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून ती मला एक अप्सरेसारखीच वाटली.

ते प्रेम होतं का??

ही हृदयस्पर्शी कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

मला माहित नाही, फक्त माझे मन म्हणत होते की माझा मित्र अजून उशिराने यावा आणि मी असेच तिला पाहत राहावे.

मला तिचे नाव जाणून घ्यायचे होते . पण तिच्याशी बोलायला कशी सुरवात करावी हे समजत नव्हते.

मला काहीच समजत नव्हते. मी फक्त देवाकडे प्रार्थना केली की मला माझ्या आयुष्यात ही मुलगी हवी आहे.

पण कसे ???

हाच प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता आणि मला अस्वस्थ करत होता.

मी फार बेचैन झालो होतो. ती मुलगी इथून जाण्याआधी तिचे नाव मला कळलेच पाहिजे. तितक्यात मागून तिच्यासाठी आवाज आला,”आग प्रिया, इथे मागे बघ.”

मग तिने मागे वळून पाहिले आणि त्या मुलीजवळ गेली. तेव्हा मला समजले कि त्या मुलीचे नाव प्रिया आहे.

मला फार आनंद झाला आणि अक्षरशः तिच्या मैत्रिणीचे आभार मानावेसे वाटले कारण तिच्यामुळे मला ह्या अप्सरेचे नाव कळले होते.

आता तिला माझे बनवायचे आहे, तिला माझ्या आयुष्यात आणायचे आहे. मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्या दोघींच्या मागून जाऊ लागलो. तितक्यात अचानक माझ्या खांद्यावर मागून एक हात आला.

मी मागे वळून पाहिले तर माझा मित्र आला होता. आता मी काय करू, मला समजत नव्हते. काय सांगू त्याला?

मी असाच विचार करत राहिलो तोपर्यंत माझ्या नजरेसमोरून निघून गेली होती. जणू माझे माझे काळीज तोडून निघून गेली होती..

मी माझ्या मित्रासोबत तिथून निघालो खरा, पण मनात तिचाच विचार करत राहिलो.  माझे मन आता तिचा विचार सोडायला तयार नव्हते. अशीच संध्याकाळ आणि रात्र पूर्ण बेचैनीत निघून गेली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजची तयारी करून कॉलेजला पोहोचलो. कलासमध्ये जाऊन बसलो.   बाजूचा मित्र काहीबाही बडबडत होता. कॉलेज मध्ये नवीन मुलगी आली आहे, फटाकडी आहे वैगरे वैगरे. पण माझे तिथे लक्षच नव्हते. मला काय त्याचे?

माझे मन अजूनही प्रियाच्याच विचारात मग्न होते. तिचा गोड चेहरा माझ्या नजरेसमोरून हटतच नव्हता.

तितक्यात साऱ्यांच्या नजर दरवाजाकडे वळल्या. सगळेजण कोणाला बघतायत असे वाटून मी पण दाराकडे पाहिले आणि क्षणभर माझ्या हृदयाची धडधड थांबली कि काय असे वाटले.

माझ्या आनंदाला काही सीमाच राहिली नव्हती. मला स्वतःचा आनंद लपवता येत नव्हता आणि  समजत नव्हते की काय करावे?

काही न बोलता फक्त माझ्या मित्राला मी घट्ट मिठी मारली आणि हसायला लागलो. तेव्हाच मला कळले की आज कॉलेजमध्ये आलेली नवीन मुलगी म्हणजे प्रिया होती.

मित्राने विचारले,”अरे तुला काय झाले अचानक?” तेव्हा त्याला मी कालचा घडलेला किस्सा सांगितलं आणि माझी स्वप्नसुंदरी म्हणजे प्रिया आहे हेदेखील सांगितले. तेव्हा तो म्हणाला, “जा आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांग.”

पण मला भीती वाटत होती. ती काय म्हणेल… तिला काय वाटेल… हा विचार मी नेहमी स्वतःला थांबवायचो.

माझे बोलणे ऐकून ती माझ्यावर रागवेल, माझी तक्रार करेल, माझ्यापासून अजूनच दूर जाईल अशी भीती वाटायची.

मला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते.

असेच काही दिवस निघून गेले. मी आणि प्रिया हळूहळू आता चांगले फ्रेंड्स बनलो होतो. आम्ही कॉलेज मध्ये एकत्र राहायचो. पण अजूनही माझ्या मनातील प्रेमभावना मी तिच्यासोबत शेअर करू शकलो नाही. माझी हिम्मतच होत नव्हती. असेच पूर्ण वर्ष निघून गेले. आमचे कॉलेज आता संपले होते. आणि आम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या होत्या. अजूनही प्रिया माझ्यासाठी फक्त मैत्रीणच होती.

मग एक दिवस मला वाटलं कि आता कॉलेज संपले आहे जॉब लागून आयुष्यही सेटल झाले आहे. आता प्रियाला प्रपोज करायला हरकत नाही. उद्या तिला भेटून माझ्या मनातील प्रेम भावना तिला सांगेन.

तिला रात्री फोन केला. नवीन जॉबचा हालहवाल विचारून थोडं जुजबी बोलणं झाल्यावर तिला म्हटले कि मला तुला उद्या भेटून काही सांगायचे आहे. तिने भेटायला हो म्हटलं आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला.

आम्ही एक वेळ ठरवली होती आणि मी वेळेआधी तिची वाट पाहत होतो.

तितक्यात ती आली. तिला पाहून आपसूक माझ्या हृदयाची धडधड आता वाढली होती.

ती येताच मी तिला म्हणालो कि मला तिच्याशी काही बोलायचे आहे. तेव्हा ती पण म्हणाली कि मला पण तुला काही बोलायचे आहे. मी खुश झालो. मला वाटले की आज ती पण तिच्या मनाचे बोलेल.

मग मी तिला म्हणालो, “तू आधी बोल.”  तिने आधी बोलायला नकार दिला. पण मी तिला आग्रह केला. म्हणालो,”लेडीज फर्स्ट.” तिने बोलण्यास सुरवात केली.

मी माझे सारे प्राण कानात एकटवून ऐकायला सुरवात केली. जणू माझा श्वास थांबला होता, तिचे प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी.

तिच्या पर्समधून एक कार्ड काढले..आणि मला दिले.

त्या क्षणी!!! त्या क्षणी माझ्या प्रेमाचा फुगा फाटकन फुटला. माझे हृदय भंगले. त्याचे तुकडे तुकडे झाले.

ते कार्ड म्हणजे तिच्या लग्नाचे आमंत्रण देणारी लग्नपत्रिका होती. मी माझ्या प्रेमाची कबुली द्यायला उशीर केला होता. खूप खूप उशीर!!!

मग काय…सगळे तिथेच थांबले…. मग तिने मला विचारले, “तुला काही सांगायचे होते ना?” मी आता काय सांगणार होतो? असाच विषय  बदलून मी काहीबाही बोललो.

“लग्नाला नक्की याचे हा!!” असे आग्रहाचे निमंत्रण देऊन माझ्या मनाचा चोळामोळा करून प्रिया तिथून निघून देखील गेली.

मी तिथेच बसून राहिलो. एका युद्ध हरलेल्या योध्यासारखा!!! तिला ‘माझी’ बनवायचे स्वप्न आता भंगले होते. म्हणूनच मित्रांनो, मनातलं सांगायला उशीर करू नका… नाहीतर इतका उशीर होईल की…. तुम्हाला तुमचं प्रेम फक्त तुमच्या स्वप्नातच करावं लागेल.

समाप्त

मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली? आपला अभिप्राय नक्की कळवा.

Leave a Reply